म्हाडा कोकण गृहनिर्माण सोडत – ११ ऑक्टोबर २०२५

मुंबई : घरांचे वाढते दर पाहता सर्वसामान्य नागरिक म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या सोडतीच्या प्रतीक्षेत असतात. दरम्यान नुकतेच म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून अर्जदारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

म्हाडा कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा तसेच वसई (जि. पालघर) येथील विविध प्रकल्पांतर्गत सदनिका आणि भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली. यामध्ये ५३५४ सदनिका आणि ओरोस (जि. सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंडांच्या विक्री काढण्यात आली. त्यानंतर आता याबाबतची सोडतबाबत तारीख समोर आली आहे. म्हाडा कोकण मंडळाची सोडत ११ ऑक्टोबर २०२५ रोजी ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडणार आहे. अशी माहिती मंडळाच्या मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांनी दिली. याबाबतचे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *